लग्नाची गोष्ट - भाग 3

  • 4.2k
  • 3k

लग्नाची गोष्ट भाग ३ मी नोकरीत हळूहळू रुळत होतो.माझ्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत होतो,पण तुटपुंज्या पगारात फार काही करू शकत नव्हतो. पुण्यातल्या भावाच्या घरी राहून मी फार काही करू शकेल असे आता वाटतं नव्हते.आता मी पंचविशी पार केली होती.एवढ्यात लग्न करावे की नको या बाबतीत द्विधा मनस्थिती होती. कधीकाळी लग्न करायचे झाले तर नोकरी करणारी पत्नी शोधायची हे मात्र मनाशी ठरवून ठेवले होते. अर्थात माझी कौटुंबिक पार्श्वभूमी व माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेता मला लग्नासाठी अशी मुलगी मिळणे दुरापास्त होते.मी नोकरीला लागल्यावर स्वतःच्या आणि कुटुंबासाठी काही गोष्टी ठरवल्या होत्या,पण ठरवल्याप्रमाणे एकही गोष्ट घडत नव्हती त्यामुळे त्या काळात