*प्रत्येक गावात न्यायपालिका उभारावी?* *प्रत्येक गावात न्यायपालिका उभारावी. कारण न्यायपालिका असेल तर गावातील गुन्ह्यांचा गावातच न्यायनिवाडा होवू शकेल. गाव गुन्हे करणाऱ्यालाच व्यक्तीला वाळीतही टाकू शकेल. त्याच भीतीनं लोकं गुन्हे करणार नाही व गुन्ह्यांची संख्या निश्चीतच कमी होईल यात शंका नाही.* गुन्हे असेही असतात की तो गुन्हा आपण स्वतः करीत नाही. त्यासाठी आपण कोणती युक्ती करीत नाही वा कोणाला सुपारी देत नाही. तो घडत असतो. तो गुन्हा नकळत घडतो आपल्या हातून आणि तो जर आपल्या जीवलगाच्या हातून घडलाच तर आपण तो गुन्हा स्वतःच्या अंगावर घेतो. त्यांच्या अंगावर टाकत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्या मुलांचं वा आपल्या पत्नीचं देता येईल. आपली मुलं