लग्नाची गोष्ट - भाग 2

  • 4.8k
  • 3.6k

लग्नाची गोष्ट भाग २ मी पुण्यात जेथे रहात होतो त्याच गल्लीत एक बाई रहायच्या. त्यांचा मुलगा माझ्याच वयाचा होता. थोडीफार त्याच्याशी मैत्रीही होती. तर,या मावशी एका शनिवारी संध्याकाळी खास माझ्याकडे आल्या. त्यांनी सहज विचारल्यासारखे दाखवत माझा रविवारचा कुठे जायचा कार्यक्रम आहे का विचारले."मी घरीच आहे", म्हटल्यावर त्या म्हणाल्या...." अरे बरे झाले, उद्या माझ्याबरोबर चल दत्तवाडीला! माझ्या भावाला तुमच्या गावाकडच्या कुणाची तरी माहीती पाहीजे आहे! त्याला मी तुझे तेच गाव आहे हे सांगितले तर त्याने रविवारी तुला घेऊन यायलाच सांगितले!"खरे तर मावशींच्या त्या भावाला ना मी कधी बघितले होते, ना त्याने मला! पण असेल काही काम, असा विचार करून रविवारी तिकडे