लग्नाची गोष्ट - भाग 1

  • 10.3k
  • 5.7k

लग्नाची गोष्ट भाग १. मी बी एस्सी च्या दुसऱ्या वर्षाला शिकत असतानाच काही कौटुंबिक कारणामुळे माझ्यावर नोकरी शोधायची वेळ आली. खरं तर अशा अर्धवट शिक्षणावर नोकरी मिळणे दुरापास्त होते,पण त्याला पर्याय नव्हता.माझे मॅट्रिक आणि बारावीचे मार्क्स बरे असल्यामुळे त्या मार्कांचा विचार होईल अशीच एखादी नोकरी मी शोधू लागलो.. माझ्या नशिबाने काही दिवसांतच माझ्या वाचनात टेलिफोन खात्याची जाहिरात आली.मी तेथे अर्ज केला आणि निवडीसाठीची परीक्षा दिली. सर्व सोपस्कार होऊन मला टेलिफोन खात्यात नोकरी मिळाली. प्रशिक्षण पूर्ण करून मी नोकरीत रुजू झालो.ही नोकरी करता करता माझे बी. एस्सी. पर्यंत शिक्षणही मी पूर्ण केले. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मी येथपर्यंत पोहोचलो होतो.आता माझ्यावर