कर्म - गीतारहस्य - 1

  • 7.4k
  • 3
  • 4.6k

कर्म . गीता रहस्य.गीतारहस्या मधील कर्म या विषयावरील विचार सांगणे हा उद्देश आहे.हे अर्जुना, कर्मे न सोडताही तू कर्मबंध सोडशील अशी ही कर्मयोगातील बुद्धि म्हणजे ज्ञान तुला सांगतो.ज्ञानप्राप्ती नंतर निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हाच पुरुषार्थ. कर्मयोग मार्गात एका जन्मात सिद्धि मिळाली नाही तरी ते कर्म पुढील जन्मात उपयोगी पडते व अखेर सद्गती मिळते.बुद्धि हा शब्द ज्ञान, समजूत, हेतू, वासना या अर्थाने वापरला गेला आहे. तसाचं व्यवसाय म्हणजेच कार्याचा निश्चय करणारे बुद्धिंद्रिय असाही अर्थ होतो. बुद्धि स्थिर नसल्याने निरनिराळ्या वासनांनी मन व्यापले जाऊन, स्वर्गप्राप्तीसाठी अमुक कर्म, पुत्र प्राप्ती साठी अमुक कर्म असे मनुष्य करू लागतो.परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करून न