ब्लॅकमेल - प्रकरण 5

  • 3.6k
  • 2.4k

प्रकरण ५ प्रचिती ला सूचना देवून पाणिनी ७६७ नंबरच्या खोलीत आला.समिधा ने त्याला विचारलं, “ कितपत संकटात आहे ही पोरगी?” “ संकटात नाहीये अगदी पण इथे येई पर्यंत तिने स्वत:चा खूप माग सोडलाय मागे.ती इथे आल्यापासूनच मला जरा बेचैन वाटायला लागलंय....” पाणिनी म्हणाला तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज आला. “ पोलीस किंवा हॉटेल चा सुरक्षा रक्षक असेल असं वाटतंय. कोणीतरी अधिकाराने वाजवलेले दार आहे.” पाणिनी म्हणाला “ विवस्वान असू शकतो?” “ नाही,नाही. पोलीस असायची शक्यता जास्त आहे.” पाणिनी म्हणाला “ दार उघडा.पोलीस आहोत आम्ही.” बाहेरून आवाज आला. “ शक्य होईल तेवढ बोलायचं काम मी करतो.” पाणिनी समिधाला म्हणाला आणि दार उघडलं.दारात