चमडा सस्ता है

  • 4.5k
  • 1
  • 1.8k

चमडा सस्ता है प्रियांकानं पगाराचं पाकिट उघडून आतले दिडशे रुपये काढून घेतले आणि दहाची नोट ठेऊन पाकिट पर्समध्ये ठेवलं. ती विद्यानगरीत डिस्टंटएज्युकेशनला लायब्ररीत गेलं वर्षभर डेली वेजीसवर जॉब करीत होती. तिला रोज सत्तर रुपये दराने महिन्यातल्या सुट्ट्या नी खाडे कापूनपगार मिळायचा. पगार झाला की सगळे पैसे मम्मीकडे द्यावे लागायचे. मम्मी बसचं तिकिट नी वरा खर्चासाठी दहा रुपये अशी नेमकी रक्कम द्यायची. त्याबाहेर महिनाभरात एक छदामसुद्धा मिळत नसे. उलट तिच्याबरोबर असणारी बहुसंख्य मुलं मुली मिळणा-या पगाराबाहेर