कोरोनाची तिसरी लाट

  • 687
  • 177

कोरोनाची तिसरी लाट म्हणता म्हणता कोरोना देशभर पसरला. कणकवली परिसरात कोरोना पसरला. पंधरा दिवसात कोरोनाने वीस बळी घेतले. मग हळू हळू आजुबाजूच्या गावॎनी कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले . कणकवलीत पिसुरे , आब्दे डॉक्टरांचे मोठे दवाखाने. त्यांच्या कडे सग़ळ्या तपासण्या करणाऱ्या सुसज्ज लॅबोरेटरी आणि तीस चाळिस बेडच्या टोलेजंग इमारती ! एरवी गर्भ श्रीमंत रुग्ण, श्रीमंत कुटुंबातल्या मुली सुना किंवा मध्यम वर्गीय घरातल्या अडलेल्या बाळंतिणी अॅडमिट व्हायच्या. पेशंट तसे बेताचेच असायचे. कारण त्यांची बीलं सामान्यांना परवडणारी नसायची. पण कमवून बसलेल्या डॉक्टरांना कसलीच चिंता नव्हती. एकदा तावडीत सापडलेल्या रुग्णाला पुरा धुतल्या शिवाय पंजातून न सोडण्याची त्यांची ट्रेड पॉलीसी अमेरिका नी चायना ट्रेड