अत्रंग

  • 1.1k
  • 1
  • 339

अत्रंग तेरवणचा दत्तू मिराशी म्हणजे अत्रंग माणूस. लांबलचक गाठ मारलेली शेंडी, भरभक्कम अंगकाठी, काळाकुळीत - ब्राह्मणाला न शोभणारा वर्ण, तिरकी बकध्यान मुद्रा, दोन भुवयांमध्ये शेंदुराची टिकली, पायघोळ धोतर आणि वर बाहीछाट मुंडे घालून कमरेला कायम पंचाचा वेढा देऊन हातात डोईभर उंचीचा सोटा घेऊन फिरणाऱ्या दत्तूला पोरेसोरे ‘राकस (राक्षस) इलो’ असे म्हणून घाबरून पळायची. पोरांची गोष्ट सोडा. . . . ..पण कर्रर्र ऽ कर्रर्र चपला वाजावीत आलेले दत्तूचे ध्यान बघून एकटी दुकटी बाईल घाबरून ओरडली तरी कोणाला नवल वाटले नसते. तेरवणात बरीचशी कुळवाड्यांची वस्ती.एकदोन भंडाऱ्यांची घरे, कुंभाराची वाडी, महारांची वाडी , धनगर वस्ती आणि मिराशांचे एकच एक घर. दत्तू ब्राह्मण फक्त