वाघजाईतले दिवस

  • 3.4k
  • 1
  • 1.2k

वाघजाईतले दिवस दादांची वाघजाईच्या शाळेत बदली झाली. त्यांचा शेती-शिक्षणाचा कोर्स झालेला अन् वाघजाईच्या शाळेत शेती विषय सुरू केलेला असूनही शेती शिक्षक नव्हता. भांबेडात दादा खुप कंटाळलेले. एकतर घरापासून बराच लांबीचा पल्ला,दुर्गम गाव आणि शाळेत मुले खुपच कमी. दुसरे म्हण जे भांबेड शाळेत फक्त चारच यत्ता असल्यामुळे शेती विषय नव्हता, म्हणून कोर्स करूनही दादांना भत्ता मिळाला नाही. तसेच वर्षभरात राजाची चौथी पुरी झाली की त्याच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्नच निर्माण झाला असता. मराठी शाळा मास्तराला काय मागितल्यावर लगेच बदली मिळणार थोडीच? म्हणून दादांनी वर्षभर अगोदरच डिस्ट्रिक्ट स्कुल बोर्डाकडे बदली मागणीचा अर्ज केला. कर्मधर्म संयोगाने अर्ज केल्यावर महिनाभरातच बदलीचा हुकूम आला. वाघजाई सगळ्यादृष्टिने