प्रकृते क्रियमाणानी

  • 759
  • 1
  • 216

प्रकृतेः क्रियमाणानि कोर्टाचा बेलिफ आणि कोतवाल ह्याना घेऊन दाजी प्रभु भिकू घाड्याच्या घरासमोर थांबला. भार्गव शास्त्रींच्या घरावर जप्ती आलेली आहे हे कळताच भिकू पुरता हडबडला. गावचा पोलिस पाटील म्हणून सरकारी कामात मदत करणे त्याला भागच होते. सगळा लवाजामा भार्गवशास्त्री सोहोनींच्या वाड्यावर जाईपर्यंत जप्तीची बातमी खाजणतडीत वणव्यासारखी पसरली. असे काही विपरीत घडेल याची गंधवार्ताही नसल्यामुळे गावावर शोककळा पसरली. हातातले काम टाकून जो-तो भार्गवशास्त्र्यांच्या घराकडे निघाला. सरकारी मंडळी अंगणात आली तेव्हा पूजा उरकून निर्माल्य टाकण्यासाठी शास्त्रीबुवा बाहेर आलेले होते. चापून चोपून नेसलेला पितांबर, खांद्यावर धाबळीचे उत्तरीय, चकचकीत श्मश्रू केलेल्या डोईवरील गोपद्माकार घेऱ्यातून बाहेर पडून मानेपर्यत रूळणारी भक्कम शेंडी, मस्तक, बाहू, छाती यावर