पोलिसांनी शाळेजवळून पेट्रोलिंग करावं?

  • 1.6k
  • 654

पोलिसांनी शाळेजवळून पेट्रोलिंग करावं? पोलीस....... फार महत्वाचा घटक. ते नसतील तर अंतर्गत सुरक्षा व्यवस्थीत राहूच शकत नाही. काही तत्ववेत्ते म्हणतात की बाहेरचे शत्रू परवडले परंतु अंतर्गत शत्रू नकोत. जसे आपले शेजारी भांडखोर असले तरी आपण निपटवून टाकतो. परंतु आपल्याच घरातील लोकं जर विश्वासघातकी असतील तर त्यांना आपण निपटवू शकत नाही. बाहुबलीनं ताकदीनं सारं जग जिंकलं. परंतु एका पुरुला हारला. माणसाच्या पराभवाबद्दल सांगायचं झाल्यास पराभव कसा होतो? याबाबत विचार करतांना रावण मृत्युशय्येवर असतांना भगवान श्रीराम जेव्हा रावणाला भेटायला गेले. तेव्हा त्यांनी रावणाला विचारलं, "तुमच्यावळ एवढं सारं होतं. सोन्याची लंका होती, अजस्र बाहूबल होतं, खंबीर वीर होते की ज्यांना विश्वात तोड नव्हती.