सृष्टीसाठी एवढंही नाही?

  • 2k
  • 867

सृष्टीसाठी! एवढंही नाही? काही लोक म्हणतात, लहानपण देगा देवा. कशाला हवं असं लहानपण. कारण त्या लहानपणात व्यक्तीला कोणतंही काम करतांना मजा वाटत असते. कोणी त्या काळात अडवत नाही आणि अडवलंच तर आपण काही त्यांचं ऐकत नाही. मग ते कोणतंही काम का असेना. त्यातच आपण पापही करायला मागंपुढं पाहात नसतो. त्यावेळेस आपण करीत असलेले कर्म आपणास पाप वाटत नसते. याउलट तसे कर्म करतांना आपल्याला मजा वाटत असते आणि ते कर्म आपण अतिशय आनंदानं करीत असतो. लहानपणी आपण असे कोणते पापकर्म करीत असतो बरे. तसा विचार मांडल्यास कोणाच्याही मनात असा विचार नक्कीच येवू शकतो. त्याचं उत्तर देतांना सांगता येईल की बालपणात आपण