रूरू - प्रमद्वरा

  • 3.6k
  • 1.5k

रूरू - प्रमद्वरा एक पौराणिक प्रेमकथाभाग-१त्या निबिड अरण्यात एक ऋषीं निर्भयपणे वाट चालत होता.त्याच्या हाती एक लांब व दणकट असा दंड होता. गोरा वर्ण...रंद छाती...बलिष्ट शरीर... धारदार नाक रूंद कपाळपट्टी...त्यावर भस्माचे तीन पट्टे....निळसर तेजस्वी डोळे....भरगच्च मिशी...छातीपर्यंत पोहचलेली काळीभोर दाढी...केसांच्या गुंडाळ्या कपाळावर व्यवस्थीत बांधल्या होत्या. उजव्या खांद्यावरून कमरेच्या डाव्या बाजूला पोहचलेला शेला.कमरेला पांढर सुती धोतर....असा त्याचा वेष होता.सकाळच्या शांत व प्रसन्न वातावरणात तो मंगल अश्या ऋचा म्हणत चालला होता.त्याच्या आवाजाने वातावरण अधिकच पवित्र व प्रसन्न झाले होते. सोनसळी सूर्यकिरणे... किलबिणारे पक्षी...रानफुलांचा गंध..फुलांवर रूंजी घालणार्या भ्रमरांचा आवाज....ह्या फुलावरून त्या फुलावर भिरणारी रंगबिरंगी फुलपाखरे...अगदी भावसमाधी लावणार ते दृश्य होत. होय तो ऋषी समाधी