कर्माच्यो गती

  • 2.9k
  • 1k

कर्माच्यो गती दर तीन वर्षाआड होणारी पाटणे वाडीतली सार्वजनीक सत्यनारायणाची पूजा म्हणजे पंचक्रोशीसाठी कौतुकाची बाब. आम्हा पोराना ते आनंदपर्वच! आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर पाटणेवाडी सुरु व्हायची.आमची घरं भुरडी लगत सखलवटात. आमच्या घरामागे उंचच उंच डेग सुरु व्हायची. अगदी ताकदवान बापया सुद्धा मागिलदारच्या अंगणा पासून तो डेग संपून सपाटी सुरू हो ई पर्यंतचा अजमासे दोनशे वाव लांबीचा टेणा जराही न थांबता किंवा वेग कमी न करता धावत पार करू शकणार नाही एवढा जीवघेणा.पावसाळी व्हावटीमुळे माती धुपून रेवा सकेर वर साठलेली , त्यावरून जपून चालावे लागे. चढण तर अशी जीव घेणी की अर्ध्या टेण्यावर पोचला की माणूस पेटीच्या भात्यासारखा श्वास घ्यायला लागे.