ब्लॅकमेल - प्रकरण 1

  • 12k
  • 1
  • 7.3k

ब्लॅकमेल प्रकरण १ “सर, आपल्या रिसेप्शन मधे एक तरुणी आल्ये, तुम्हाला भेटायला. पण ती आपलं नाव सांगायला तयार नाहीये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ मग हाकलून दे तिला.” सौंम्याकडे न बघताच पाणिनी म्हणाला. “ तरी सुद्धा मला वाटतंय की तुम्ही एकदा भेटावं.”-सौंम्या “ काय विशेष आहे त्यात की मी भेटायलाच हवं ?” “ तुम्ही स्वत: ते ऐकून घ्यावं सर.”-सौंम्या “ तू फारच गूढ बोलायला लागल्येस. ठीक आहे तू म्हणते आहेस तर येऊ दे तिला.” पाणिनी म्हणाला सौंम्या आपल्या बरोबर एका तरुणीला घेऊन आली. अत्यंत निराश असा चेहेरा आणि मानसिक तणावाने सर्वांग थरथरत होतं. “ घाबरु नकोस.मी तुला मदत करीन. काय हवंय