प्रेमात कधी कधी....

  • 2k
  • 729

प्रेमात कधी कधी....कथेचे सर्व हक्क लेखकाकडे रेल्वे अगदी हळुवारपणे बडनेरा स्टेशनला थांबली. " तुम बिन जिया जाए कैसे... कैसे जिया जाए तुम बिन " स्नेहाने मोबाईल मध्ये सुरु असलेलं गीत अचानकपणे बंद केलं आणि कानातले हेडफोन बाहेर काढले. नेत्राच्या कडा अश्रूंनी पाणावल्या होत्या. काही अश्रुधारा कशालाही न जुमानता तिच्या गोबऱ्या गालावर येऊन साचल्या. " 16 जून.... आजही तीच तारीख.... तेच बडनेरा स्टेशन" नकळतपणे तिच्या ओठातून एवढेच शब्द बाहेर पडले. रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं वातावरण अगदी ढगाळ झालं होत. कुठल्याही क्षणी वरुण राजांचे आगमन होण्याची चिन्हे सर्वत्र दिसत होती. स्टेशनवर गरम चाय.... गरम चाय च्या स्वरांनी स्नेहाच्या कानठळ्या बसायला लागल्या होत्या. वाऱ्याच्या