सर येते आणिक जाते - 8

  • 3k
  • 1.4k

घरी प्रथमाची आई तिची वाट पाहत होती. तिची घरी येण्याची नेहमीची वेळ केव्हाच टळून गेली होती. काही फोन देखील आला नव्हता. आईला आधी वाटले की ऑफिसमध्ये काही ज्यादाचे काम निघाले असेल, कदाचित त्यामुळे तिला आज घरी यायला उशीर झाला असेल. पण असे असते तर तिने फोन करून किंवा मेसेज करून कळविले असते. शेवटी न राहवून आईने तिला फोन लावला. पण छे, आईचा फोन देखील ती उचलत नव्हती. काही कळण्यास मार्ग नव्हता की प्रथमा गेली तरी कुठे. असे न कळविता ती कधीही घराबाहेर इतका वेळ राहिली नव्हती. आता मात्र आईच्या काळजाची धडधड वाढू लागली होती. काय करावे असा विचार करत करत