तुंबसाळ

  • 906
  • 1
  • 336

तुंबसाळ काकबली टाकुन माघारी वळताना डेरेच्या कडेला घुशींनी काढलेला उकीर जरा भळभळल्यासारखा वाटला तेव्हा बिळातून कोणी साप किरडू तर बाहेर येत नाही ना? म्हणून निरखुन पहाणाऱ्या बाईला भुरूभुरू बाहेर पडणाऱ्या तुंबसाळ माशा दिसल्या. हल्ली नजर जरा कमी झालेली म्हणून चार पावले पुढेजाऊन तिने नीट तिरखुन बघितले. शंकाच नव्हती, चांगल्या आंगठ्याएवढ्या टरटरीत तुंबसाळींची विशिष्ट लयीत सुरू झालेली ये - जा बघितल्यावर त्यांनी डेगेतल्या घुशीच्या बिळात ठीव (रहिवास) केलेले असणार याची अटकळ बाईला आली आणि तिच्या काळजाात चर्रर्र झाले. चार मुलींच्या पाठीवर दिवस भरत आलेली सुन ! तिला बाळंतपणासाठी कणकवलीच्या धाकट्या जावयांकडे -पेठ्यांकडे पोचवायला गेलेला आणि घरात फक्त बाई आणि तिच्या चार