देवाची सामक्षा

  • 579
  • 1
  • 219

देवाची सामक्षा चार मुलींच्या पाठीवर काकुला नवससायासाने मुलगा झाला. सगळे देव पालवुन झाले. शेवटी आमच्या घृष्णेश्वराला अण्णानी जाब घातला नि त्याच्या प्रसादाने मोहनचा जन्म झाला. तेव्हापासून दर वर्षी वामनकाका घृष्णेश्वराच्या उत्सवाला नेमाने यायला लागले. काकु तेवढी चार-दोन वर्षानी यायची. हया खेपेला मात्र काकु तब्बल आठ वर्षानी आलेली. मोहन आता चांगला मोठा झालेला. तसा तो माझ्यापेक्षा दोन वर्षानी लहान. पण लाडाकोडात वाढल्यामुळे दूध तुप नी अक्रोड बदामाचा खुराक खावून तो माझ्यापेक्षा भारी दणकट नि थोराड वाटायचा. खुप वर्षानी भेटलेल्या आम्हां भावडांच्या गप्पा रंगात आल्या. तिन्हीसांज झाली नी आटवल खाऊन आम्ही ओसरीवर झोप्या काढीत गाणी म्हणत राहीलो. रात्री निजानिज झाली तरी आमच्या