शिदोरी

  • 948
  • 1
  • 285

शिदोरी बाळुच्या दत्तकविधानासाठी त्याचे म्हातारे वडिल बापू आणि वडिलभाऊ अण्णा मास्तर दामल्यांच्या वाड्यात आले. आपल्याला बघून बाळू धाव मारीत येईल, आपण त्याला पोटाशी घेऊ, बाळू हमसा हुमशी रडत म्हणेल,“बापू ऽऽऽ मी दत्तक गेलो तरी तुम्हाला विसरणार नाही. महिना-पंधरा दिवसांनी घरी खेप करीन.”अशी बापूंना तर खात्री! पण कसचे काय, दामल्यांचा प्रशस्त वाडा,गडगंज इस्टेट यांत बाळू एवढा मश्गुल की साधे ‘केव्हाआलात?’ इतके विचारायलाही त्याला फावले नाही. अपमानाची लाजिरवाणी बोचणी बापूंचे काळीज कुरतडायला लागली. पण आतड्याची