सापांचे दिवस

  • 2.6k
  • 1
  • 993

सापांचे दिवस पुढिल दारच्या अंगणा पासून सात आठ हात अंतरावर पुरुषभर उंचीची डेग आहे . ती चढून वर गेले की सवथळ मरड लागते. त्याच्या कडेला काळ्यांच्या आगराची हद्द संपून सामाईक पाणंद लागते, नी त्या पलिकडे धारेला घडीव चिऱ्यानी बांधलेल्या पारावर वडा पिंपळाची दोन जुनाट झाडे आहेत. आमच्या काळे घराण्याच्या नवव्या पिढित समाधी घेतलेले आमचे पुर्वज ‘ स्वामी’ त्यानी ते वड पिंपळ लावून घडीव चिऱ्यांचा पार बांधून घेतला नी पिंपळाची मुंज केली अशी आख्यायिका मोठी माणसे सांगतात. पिंपळाच्या टिकाळीला घारी ‌- गरुड घरटी बांधित. पिंपळाचा एक फाटा वाळून कोळ झालेला नी त्याच्यावर कांडेचोरांच्या ढोली असायच्या. त्यांत कांडेचोरानी वीण घातली की महिनाभराने