देवाचं देवपण

  • 3.8k
  • 1
  • 1.6k

देवाचं देवपण ऐन उन्हाच्या कारात चिरगुटं धुवून हैराण झालेला भग्या परीट आणि त्याची मागारीण जनी....भिकशेट तेल्याला सहा चेडवांच्यापाठीवर कळंबेश्वर मुळवसाच्या नवसाने झालेला झील....भिकशेट म्हणजे गाव ऱ्हाटीतली तालेवार असामी... पिढीजात सावकारी नी सात खण्डी भाताचा मळा. पण त्याच्या बायकोला हारीने सहा चेडवंच झाली.सहाव्या खेपी चेडूच झालं तेंव्हा तेल्याच्या म्हातारीने असा गळा काढला की शेजारच्या घाडी वाडीतले बापये काय झालं म्हणून समाचाराला तेल्याच्या खळ्यात जमले. म्हातारी भलतीच कातावलेली. सून अवलक्षणी म्हणून