कालासगिरीची रहस्यकथा - 5

  • 6.4k
  • 4.6k

अध्याय 14   दुपारी, सगळ्यांनी जेवण करून आपली कामं पूर्ण केली होती, तेव्हा मुलांना थोडा मोकळा वेळ मिळाला. त्यांनी आपल्या आईकडून डोंगरावरील मंदिरात जाण्यासाठी परवानगी घेतली. अन्वीने संध्याकाळपर्यंत थांबण्याचा सुचवले, पण मीराने त्यांना लगेचच जाण्याचा आग्रह धरला. सायलीने सांगितले की प्रवासाला सुमारे एक तास लागेल, त्यामुळे ते सूर्यास्तापूर्वी परत येन नाही जमेल . निलीमाने त्यांना त्यांच्या वडिलांना सांगायला सांगितले आणि सायलीने मान डोलावली.   सगड़े शाळेकडे गेले, सरपंच आणि त्यांच्या वडिलांकडून परवानगी मिळवण्यासाठी. डॉ. संकेत रुग्ण तपासण्यात व्यस्त होते, डॉ. यश यांच्या सोबत होते . सरपंच काही गावकऱ्यांसोबत आणि श्यामसोबत बसलेले होते. सायलीने सरपंचांना परवानगी मागितली. "खूप उन्ह आहे. तुम्ही