उपल्वटी वांदर

  • 756
  • 1
  • 246

उपल्वटी वांदर त्यावर्षी दसरा झाला नी अकल्पितपणे टोळधाडी सारख्या वादरांची टोळी आमच्या गावात दाखल झाली. आमच्या आगराला लागूनच हरीभाऊंच घर नी आगर. त्यांच्या मागिल दारी न्हाणीघर विहीर आणि खालच्या अंगाला रामाच्या देवळाजवळ डेगेबरोबर महाप्रचंड चिंचेचं झाड. दोन बापयांच्या वेंगेत मावणार नाही इतकं मोठं सहा एक हात उंच कांड नी त्यावर चार उंच डेळे. अगदी वाटणी करावी तसे निम्मे विस्तॎर हरीभाऊंच्या आगरात नी अर्धाविस्तार आमच्या आगरात. आम्ही भावंडं सकाळी दात घाशीत घाशीत अंगणात गेलो नी हुप्प हुप्प असा आवाज आला म्हणून पहातोय तर चिंचेवर वांदर बसले दिसले. आवाज आयकून आज्जीही बाहेर अंगणात आली . आम्ही कौतुकाने चिंचेकडे बोटं करून ते बघ