जोसेफाईन - 11 (अंतिम भाग)

  • 4.2k
  • 1.9k

सुमित ने गुरुजींच्या कानात काहीतरी सांगितले. गुरुजींनी काही क्षण विचार करून सुमितला काहीतरी सांगितले. सुमित विचारात पडला पण त्याने घरमालकाकडून जो फोन नंबर घेतला होता तो लावला. पलीकडे बराच वेळ रिंग वाजू लागली पण कोणीच फोन उचलला नाही. "गुरुजी कोणी फोन उचलत नाहिये " सुमित "पुन्हा पुन्हा लावा. आता आपण थांबू शकत नाही. काही करून अनिल ला इथे आणणे आवश्यक आहे. " गुरुजी पोट तिडिकेने म्हणाले.सुमित वारंवार फोन लावू लागला. इकडे जोसेफाईईन चे डोलणे सुरूच होते. सहाव्या प्रयत्नात पलीकडे कोणीतरी फोन उचलला. कोणीतरी झोपाळू आवाजात सुमितशी बोललं पण सुमित ने जे सांगितलं ते ऐकून पलीकडच्या माणसाची खाडकन झोप उडाली. सुमित