ओढ - प्रेमकथा - (शेवट भाग)

  • 3.5k
  • 2.1k

मध्य वरून पुढे विचारांच दोलन सारख मागे पुढे झुलत होत.. त्यातला एक विचार अती उच्च तर दुसरा फारच शूद्र वाटत होता. नकूलसाठी यापुढचा मार्ग फार काही सोयीस्कर नव्हता. तसं पाहिल तर स्थिती एवढीही गुंतागुंतीची, क्लिष्ट नव्हती. सर्व हिशोब तर व्यवस्थित मांडून होता. दिग्दर्शक या क्षेत्रावरच नकूलने जीवापाड प्रेम केल होत. अगदी बेंबीच्या देठापासून झोपता उठता एकच स्वप्न त्याने पाहिलं होत यशस्वी लेखक, दिग्दर्शक व्हायच. मग आज त्याला त्याची पाऊले का जड वाटत होती? मनाच्या कुठल्यातरी अज्ञात कोपऱ्यात तीच हलकस नाव कोरून होत का? मनाच्या शांत नीलवर्णी सरोवरात तीचही लहकस प्रतिबिंब उमटून होत का? बरेच प्रश्न त्याच्या मनावर तरंगत होते आणी