घरोघरी एक तरी झाड लावूया

  • 1.8k
  • 771

घरोघरी एक तरी झाड लावूया झाड........ सध्या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशातच उष्णतामान वाढलं आहे. महाराष्ट्राचा विचार केल्या गेला तर महाराष्ट्रात यवतमाळ आणि चंद्रपूर हे जास्त तापमानाचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षीच त्या जिल्ह्यात भयंकर मोठ्या प्रमाणावर तापमान असतं. मात्र यावर्षी यवतमाळ ऐवजी व चंद्रपूर ऐवजी अकोला जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागला, तापमान वाढीत. त्याचं कारण काय असावं? विदर्भाचं तापमान वाढत आहे. याला कारणीभूत असतात झाडं. मग विदर्भात झाडं नाहीत का आणि झाडं नाहीत तर जंगलाचे भाग कसे दिसतात? आज हाच भाग फिरायला निघालो तर झाडंच झाडं दिसतात शिवारात. मग तरीही आपली ओरड की विदर्भाच्या या मातीत झाडं नाहीत.