ओढ - प्रेमकथा - भाग 1

  • 11.7k
  • 5.7k

ओढ -- प्रेमकथा (भाग 1)कथेचे सर्व हक्क लेखकाकडे 'आज तिसरा दिवस तिला न पाहण्याचा' तो स्वतःशीच म्हणाला. त्याची अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. तिच्या असं अचानक गायब होण्याने त्याच्या हृदयात शल्य विशल्य निर्माण होत होतं. कितीतरी वेळ तो तसाच बाहेर कोसळणाऱ्या वर्षांसरिंना एकटक पाहत होता. कॉलेजनंतर फार क्वचितच त्याने असा शांत भासणारा पाऊस पाहला होता. आसमंतला सप्तरंगाचा इंद्रधनू शालू नेसलेला.. सात रंगाच्या छटेतून थंडगार पावसाचे थेंब धरणीला भेटायला आतूर झाले होते. त्या पावसात तरी त्याला काय दिसत काय असावं. तिची सुंदर मूर्ती की तिचे केळीच्या गाभ्यासारखे ईवले ईवले हात ज्यात ती हिऱ्यासारखे पावसाचे टपोरे थेंब मुठीत घट्ट आवळून लहान