कथा मानवी जठराची

  • 3.5k
  • 1.3k

कथा मानवी जठराची हर्ष सकाळी उठला तो पोट धरुन व तोंड वेडेवाकडे करतच. "असं तोंड वेडेवाकडे का करतोस?" आईने विचारले. " पोटात प्रचंड दुखतेय. काहीतरी औषध दे.आई..आई..ग्..." हर्ष वेदनेने कळवळत म्हणाला. "काल गौरीच्या वाढदिवसाला मिळेल ते हादडल असणार. खाताना जरा विचार करून खायचं ना!" आई वैतागली " खाताना कोण विचार करत काय?" हर्ष रडकुंडीला आला होता.पोट धरून गडाबडा लोळाव असं त्याला वाटत होतं. आईने घरातून गुळ चिंच आणून दिली. " छी..छी...हे खायचं?" " गुपचूप खा...पोट दुखायचे थांबेल... नाहीतर बाबा आल्यावर डाॅक्टरांकडे जावं लागेल." हर्षने नाईलाजाने गूळ व चिंच खाल्ली. त्यावर थोड पाणी पिल्यावर त्याला बरं वाटलं. अरे यार, हे पोट