गव्हाच्या कुरवड्या

  • 2.9k
  • 966

काल आमच्या साहेबांनी एका प्रदर्शनाला भेट दिली.तिथं महाराष्ट्रातील विविध प्रांतातील खाण्याचे खास पदार्थ यांची विक्री केंद्रे होती.त्यांनी जसा घरात पाय ठेवला," मग एकटे एकटे जाऊन आलात. हादडले असेल पोटभर , आमची आठवण तरी आली का?""हे बघ तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे.""तुम्हीच खा. मला नको. मी काहीशा घुश्यातचं पुटपुटले."बघ तरी.."न राहवून माझी नजर तिकडे गेलीच.कुरवड्या !!त्यांच्या हातातून चक्क ते पाकीट हिसकावून घेत मी अनिमिष नजरेने तिच्याकडे बघू लागले."लगेच तळते."कुरवड्यांचे पाकीट फोडताना गव्हाच्या कुरवड्यांचा विशिष्ट वास असतो तो नाकात शिरला आणि अस्सल चीज आणली म्हणून मी ह्यांना (मनातल्या मनात बर का ) हुश्शार आहेत ही पावती दिली. गव्हाच्या कुरवड्यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांचा वास,