एक सैतानी रात्र - भाग 45

  • 2.5k
  • 897

भाग 45माने साहेब व नेमाडे साहेब , दोघेही त्या हैवानांची चाहूल लागताच शिताफीने दगडाच आडोसा घेऊन लपून बसले . तीस मीटर अंतरावर छाती ईतक्या वाढलेल्या झुडपांत हालचाल झाली, आणी एकसाथ ती चार हैवान घोळक्याने बाहेर आली.. माने व नेमाडे दोघेही आश्चर्यकारक नजरेने समोर पाहत होते . वीस मीटर अंतरावर , जिथे ती अघोरी विधी घडली होती - तिथे चार जण उभी होती. तीन जण एकाच शरीरयष्टीचे होते - आणी त्यांची चाल वानरासारखी होती. मधला तो धिप्पाड देहाचा राका मात्र मांणसासारखा ताठ चालत होता. चौघांच्याही अंगावर कपडे म्हंणून एक खाकी पेंट होती - बाकी वरच शरीर मात्र उघड होत. चेहरा विद्रूप