एक सैतानी रात्र - भाग 42

  • 1.9k
  • 630

भाग42सर्वात पुढे ईं:रणदिवे धावत होते, आणी त्यांच्या मागोमाग त्यांचे नऊ फोर्स मेंबर्स धावतांना दिसत होते. आजुबाजुला मोठ मोठाली झाडे होती - झुडपे होती! त्यांच्या मधून वाट काढत ही सर्वजन धावत निघाली होती. सर्वात शेवटी एक फोर्स मेंबर्स धावतांना दिसत होता - त्याच्या चेह-यावर कमालीची भीती दाटून आलेली दिसत होती , कपाळावरुन घामाचे द्रवबिंदू धबधब्यासारखे येत चेहरा भिजवत होते. छाती फुगवून फुगवून तो आत श्वास भरत होता . तोच अचानक एका काळ्या सावलीने विरुद्ध दिशेने वेगाने येऊन त्याच्या अंगावर उडी घेतली, अलगद त्याला झाडझुडपांत पाडल..- ती सावली त्या मेंबरच्या छाताडावर बसली होती.. त्या सावलीने आपला हात वर नेहला, त्या हातात गोळसर