स्वप्नद्वार - 7

  • 2.9k
  • 1.5k

स्वप्नद्वार ( भाग 7) भाग 6 वरून पुढे. त्या अमानवी शक्तीने निशांतच्या मानेवर दुसरा प्रहार करण्यासाठी तलवार उचलली. बाहेर वाऱ्याचे झोत सैरभैर थैमान घालत होते. त्या अमानवी शक्तीच्या हातात असलेली तलवार वाऱ्याला कापत विजेच्या वेगाने निशांतच्या मानेपर्यंत पोहचणार इतक्यात कुठल्यातरी दिव्य तेजपूंजी पुरुषाच्या हाताच्या मुठीला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळून होत्या. तो प्रहार त्यांनी आपल्या भरदार हाताच्या मुठीवर घेतला. कोण...... कोण होते ते विराट दिव्य तेजोमय पुरुष.... ते होते.... आचार्य विष्णुगुप्त. त्यांच्या सोबत त्यांचा शिष्य आर्यही होता. त्या अमानवी शक्तीच ते बिभित्स रूप आणि त्याच्या डोक्यावरच ते लालसर मास पाहून त्याच्या पोटात खड्डा पडला. डोक्यात विचारांचे घणघणाती घाव एका पाठोपाठ एक सुरु