भाग ३८ रक्तपात 4 काय ते देह ? काय ते आकार ? सर्वच अमानविय, अनैसर्गिक , अतर्कनिय होत. निसर्गाची सपशेल थेर खिळली , उडवली होती - त्या हरामखोरांनी ! हे असल वेडबिंद्र, चालत फिरत हैवान जन्माला घातल होत.ती चार हैवान एकाच रक्तनळीकेतून तैयार झालेली..रक्तरेखेची भावंड होती- म्हंणजेच द ब्लडलाईन होती.ते हैवान एकाच जागेवर नग्न अवस्थेत उभे होते. माकडासारखे हात खाली सोडलेले, क्ंबर जराशी वाकली होती.ते चौघेही गोल वर्तुळाकारात उभे होते. " म्हा........म्हा.......म्हा......!" त्या तीन लुकड्यांमधला एक जण बोलू लागला.बोलतांना मध्येच तो डोळ्यांची आणी हातांची एक विशिष्ट प्रकारची हालचाल करत होता. त्या हैवानांना मानवी भाषा अद्याप येत नसावी - जस एक