भाग 32 जंगलातल्या खडकाळ मातीच्या रसत्यावरून वनविभाग ऑफिसर शशिकांत नेमाडे साहेबांचीचार चाकी जिप वेगाने धावत निघाली होती. जीपच्या हेडलाईटचा पिवळा प्रकाश समोर पडला होता. त्या पिवळ्या प्रकाशात समोरचा तपकीरी रंगाचा रस्ता , आजुबाजूची मोठ मोठाली हिरवी झाडे, कमरेइतकी वाढलेली झुडपे नजरेस पडत होती. ड्राईव्ह सीटवर नेमाडे साहेब बसले होते.. बाजुच्या सीटवर पोलिस ऑफिसर माने साहेब बसलेले , आणी मागचे चार सीट रिकामे होते. " माने साहेब हे शैडो- रेंचो नक्की काय करण्याच्या मागे असावेत?" नेमाडे साहेब स्टेरिंग फिरवत बोलले. जिपने डाव्या बाजुला वळण घेतल.. इंजिनचा घर्रघर्राट वाजवत रस्त्यावरून धावू लागली. " नो आईडीया नेमाडे साहेब , हे प्रकरण जरा डोक्यावरून