एक सैतानी रात्र - भाग 23

  • 1.1k
  • 225

भाग 23  काहीवेळा पुर्वी : "टींग,टोँग,टिंग,टोँग" बेल वाजण्याचा आवाज होत-होता . तोच आवाज गोडमारेच्या कानांवरही पडत होता. आजुबाजुला सहज नजर फिरवली तर पांढरट शबनम आपल्या सफेद साडीत फिरताना दिसत होती. भीतीने अंगाला बोचरी थंडी जाणवायला सुरवात झाली होती. पुढच्या पांढरट धुक्यात न जाणे काय हिडीस दडून बसल असेल? त्याच्या भुकेची गणना किती असेल? रक्तमांसासाठी हरवटलेल ते,त्याच्या उपस्थीपोटी बाहेर थांबण धोक्याच होत! ते जे काही धुक्याच्या वळयांत वावरत होत. ते आपल्याल एकट पाहून कधी केव्हा कस चाल करुन बाहेर येइल, सांगता येत नव्हत. " दरवाजा उघडा माने सायेब ,दरवाज उघडा !" गोडमारेचा काफरा आवाज त्या अभद्र शांततेत गिळला जात होता.