एक सैतानी रात्र - भाग 16

  • 2.1k
  • 693

S 2. Ep 5 भाग 5 = . काहीवेळा अगोदर... बलवंतरावांच्या गार्डनमध्ये जमलेल्या पाहूण्यांच्या गप्पागोष्टी सुरु होत्या. हातात काचेच ग्लास, त्यात ओतलेली उच्च प्रतिची दारु, डोक्यात नशेचा वायरस सोडुन गेली होती. डोळ्यांच्या पापण्या जड,आणि गाल लाल झाले होते.पुरूषांच्या गप्पा एका बाजुला तर स्त्रीयांच्या एका बाजुला असा एक गट पडला होता. गोल घोळक्यात उभे राहून दारु प्राशन करत पुरूष वर्ग बोलण्यात गुंतले होते. तर बाजुला असलेल्या बायकाही बोलण्यात गुंतल्या होत्या.बायकांच नेहमीचंच तेच बोलण सुरु होत-" अंग बाई तुझी साडी किती छान आहे ग? वाव नाईस नेक्लेस, कितीला पडल? अंग आमचे हे दुस-या शहरात गेलते ना तर जरा जास्तच किंमतीत घेऊन आलेत?"