एक सैतानी रात्र - भाग 15

  • 3.2k
  • 1.2k

Season 2. Ep 4 भाग 15 सुलतान ब्लॉकच्या थप्पी मागे लपला होता. आणि दर वीस सेकंदानी डोक थोड बाहेर काढून टेरीसच्या उघड्या चौकटीकडे चोरुन पाहत होता. सहा-साडे सहा फुट उंच दरवाज्याची चौकट त्या पल्याड गर्द अंधार दिसत होता. आकाशात उमटलेल्या अर्ध्या चांदण्याची चंदेरी किरणे टेरीस उजळून गेली होती.सोसाट्याचा वारा टेरीसवर भुतासारखा घुटमळत फिरत होता. हवेच्या थंड झोतांनी सुलतानच्या अंगावर शहारा येऊन जात देहात एकावर एक भीतीचा ठणका उमटत होता. ह्दयात पडणा-या प्रत्येक ठोक्याला एक कल उमटत होती, अंधारातुन पाश्वी,सैतानी शक्तिचा कोठून कस वार होईल? सैतान हवेत उडून येइल? अचानक समोर प्रगट होईल? मानेचा लचका तोडून,कच्च खाईल ! काहीच काहीच कळत