कठोपनिषद - 1

  • 8.4k
  • 3.5k

कठोपनिषद -कठोपनिषद हे यमराज व नचिकेता नामक ऋषीपुत्र यांच्यातील संवाद आहे. नचिकेताचे पिता हे ऋषी असतात. ते दानामधे उपयोग नसलेल्या गायी देत असतं. हे नचिकेताला योग्य वाटत नसे. एक दिवस त्यांनी पिताश्री ना विचारले मला कोणाला दान द्याल व हा प्रश्न दोन तीनदा विचारल्यावर ऋषी क्रोधाने मी तुला "मृत्यू ला " देईन असे म्हणतात.नचिकेता जेव्हा यमराजांकडे जातात तेव्हा यमराज तेथे नसतात. तेथील लोक नचिकेता कडे लक्ष देत नाहीत. तीन दिवस नचिकेता उपाशी राहतात. अतिथी सत्कार करणे हे एक कर्तव्य आहे. यमराज परत आल्यावर त्यांना लोक सांगतात की अतिथी सत्कार न करणे वाईट आहे. अतिथीला तृप्त केले नाही तर पुण्य क्षय