बुद्धिमान बायको - भाग १

  • 8.4k
  • 4.4k

बुद्धिमान बायको भाग  १ वैशाख एका फॅक्टरीत मेंटेनेंस मॅनेजर होता, आणि त्या दिवशी सॉलिड चिडला होता. एक महत्वाचं मशीन बंद पडलं होतं. प्रॉडक्शन थांबलं होतं. सगळे प्रॉडक्शन वाले लोकं कोंडाळं करून उभे होते, आणि प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर केंव्हा सुरू होणार हे मशीन असा प्रश्न होता. फॉल्ट तर कळला होता, पण तो दुरुस्त करण्यासाठी जो पार्ट लागणार होता, तो फॅक्टरीच्या स्टोअर मधे उपलब्ध नव्हता. आता अश्या परिस्थितीत मशीन सुरू कसं होणार, हा यक्ष प्रश्न होता. प्रॉडक्शन मॅनेजरने जाऊन जनरल मॅनेजरला परिस्थितीची जाणीव करून दिली. साहेब ताबडतोब मशीनपाशी आले. “काय झालं वैशाख?” साहेबांनी विचारलं. वैशाख आधीच वैतागला होता, त्यात एकेरी नावाने कोण बोलतेय