*जनता बेहाल, नेते मालामाल;म्हणूनच मतदानाची टक्केवारी गोलमाल?* *सध्या निवडणुकीचा पहिला चरण संपला. त्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली व सर्वांना चिंता पडली. मतदारांनी मतदानाकडे पाठ का फिरवली. त्यात बरीच कारणं आहेत. परंतु तशी बरीच कारणं असली तरी एक महत्वपूर्ण कारण आहे. ते म्हणजे बहिष्कार. मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारीवरुन कळतं की जनतेला सत्ताधारी व विरोधी पक्ष आवडलेले नसावेत नव्हे तर त्यांचं कार्य आवडलेलं नसावं.* निवडणुकीबाबत सांगायचं झाल्यास निवडणूक ही अशी प्रक्रिया आहे की जी लोकांचा आत्मा आहे. ती जर नसेल तर लोकांना मोकळा श्वासच घेता येणार नाही. निवडणुकीचा प्रसंग असा असतो की त्याद्वारे लोकं जनप्रतिनीधी जर अत्याचारी निघाला तर त्याला त्याची जागा