एक होती मुन्नी "अरे भाय ..तू कायको मेरा फिकर करता ..मी ठीक हाय.." मुन्नी तिच्या पुण्यात राहणाऱ्या भावाशी फोन वरून बोलत होती...."तेरे पास पैसा जास्ती हुवा क्या ..तू रख अभी..मेरेको काम को जाणा है.." असं म्हणून तिने फोन कट केला...तीच ते बंबैय्या हिंदी फारच मजेदार वाटायचं ऐकायला...ती फोनवर जास्त बोलायची नाही... तीला बोलायला आवडायचं नाही असं न्हवत. तोंडाची टकळी कायम सुरु..पण फोनवर बोलायला पैसे लागतात..आणि बोलण्यासाठी पैसे खर्च करण तिला आवडत न्हवत... मुन्नी माझ्या आईची बालमैत्रीण...उंचीने कमी , रंगाने सावळी, सांगण्याचं तात्पर्य मुन्नी दिसायला सुंदर वैगेरे न्हवती, हे झाल माझ लहानपणीच मत पण आता विचारलं तर तिच्यासारखी अत्यंत