एकतेत ताकद नसते काहो?

  • 639
  • 240

एकतेत ताकद नसते काहो? *निवडणूक....... निवडणूक म्हटलं तर निवडणुकीत स्वातंत्र्य असल्यानं भरपूर उभे राहणारे आहेत. विशेषतः आंबेडकरी समुदायात स्वातंत्र्य असल्यानं व संविधानानुसार प्रत्येकाला निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार असल्यानं जो तो निवडणुकीत उभा राहात असलेला निदर्शनास येतो. तसं अमेरिकेत नाही. अमेरिकेत दोनच पक्ष आहेत. म्हणूनच अमेरिका महासत्ता बनत चाललाय. कारण तिथं दोनच पक्ष असल्यानं इतर कोणत्याही पक्षासाठी निवडणुकीच्या माध्यमातून खर्च होत नाही. तो पैसा वाचतो व त्या वाचलेल्या पैशातून देशातील इतर कोणत्याही गोष्टीसाठी वा विकासासाठी खर्च करता येतो व देशाचा विकास करता येतो. तसं भारतात नसल्यानं भारत आजही विकासाच्या बाबतीत मागं आहे आणि जेव्हापर्यंत असं सुरु असेल, तेव्हापर्यंत आपला देश मागंच