हा देश गरीबांचा की धनीकांचा

  • 639
  • 264

हा देश गरीबांचा की धनीकांचा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत. अशी प्रतिज्ञा आपण रोजच घेतो शाळेत आणि अशी प्रार्थना म्हणत म्हणत शिकत असतो. त्यावेळेस ती प्रार्थना म्हणतांना आपले बंधूप्रेम उफाळून येते. मग भारत हा धर्मनिरपेक्ष असंही आपण म्हणतो. परंतु खऱ्या अर्थानं या देशाला आपण धर्मनिरपेक्ष समजतो का? याचं उत्तर नाही असंच येईल. त्यानंतर समता, बंधुता हे आपले मुल्य सर्वच बाबतीत वेशीच्या पलीकडे राहतात आणि भेदभाव वाढीस लागतो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा आणि संविधान आम्ही लहान राहतो, तेव्हापर्यंत ठीक आहे. परंतु पुढं मोठे झाल्यावर तीच प्रतिज्ञा आपणाला डोईजड जाते. मग