नववा मजला

  • 8.7k
  • 1
  • 3.7k

मुंबई सारख्या ठिकाणी सुंदर झाडी असलेले एक लोकेशन, छान हवा सुरु होती, सगळे काही नेहमीप्रमाणे सुरू होते, जो तो आपल्या कामात व्यस्त होता, समोरच एक कर्मशियल टॉवर दिमाखात उभे होते. ज्यातून नोकरदार मंडळी घराच्या दिशेने निघाले होते, काही जण अगदी समोरच्याच रेसिंडेन्शयल टॉवर मध्ये वास्तव्यास होते. आपल्या इच्छित मजल्याचे बटण दाबून सगळेच लिफ्ट ने जात होते. त्यात रितेश हा नवव्या मजल्यावर राहत होता. तो त्याच्या घरी आला दार उघडून काही वेळ पंख्याखाली बसल्यावर तो हात पाय धुण्यासाठी न्हाणीघरात गेला, पाण्याचा खूप मोठा आवाज त्याला आला, तसे त्याने खिडकीचे तावदान उघडून पाहिले, त्याच्या न्हाणीघराच्या खिडकीबाहेर मोठा पाईप फुटून वाहत होता, आणि