प्रथमाचे नवीन ऑफिस मधील ट्रेनिंग आणि सिलेक्शनचे सुरवातीचे दिवस अतिशय छान गेले होते. आता नवीन प्रोजेक्ट, ज्यात तिचे सिलेक्शन झाले होते तेथील दिवसही छान जातील अशी तिला खात्री होती. फार क्वचितच केव्हा तरी नकारात्मक विचार तिच्या डोक्यात येत असत. अन्यथा प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करून त्याचे फक्त सकारात्मक पैलू बघण्यात तिला रस असे.आज वीकएंडची सुरुवात झाल्यामुळे, प्रथमा व तिची आई मनसोक्त गप्पा मारत बसल्या होत्या. तिच्या आईचे विचार तिला नेहमीच प्रोत्साहित करत असत. तिची आई तिला नेहमी सांगायची की "आयुष्यातील प्रत्येक उतार-चढाव हा आपल्या आंतरिक शक्तीच्या बळावरच सर करता येतो. आणि ते ज्याचे त्याने करायचे असते. ते करण्यासाठी स्वतःला इतके