ही अनोखी गाठ - भाग 3

  • 5.6k
  • 4k

भाग -3थोड्या वेळात किशोर माधवीचा भाउ येतो...नंतर सर्व जण जेवण आटोपून हॉल मध्ये गप्पा मारत बसतात..." ताई चल जातो मी येईन पुन्हा कधीतरी असं म्हणत किशोर दिशा ला घेऊन निघून जातो....."पुढे........पाच दिवस लगेच निघून गेले...... कुसुम शरदराव आणि आदिती तिघेही हर्षा ला घ्यायला पुण्याला आले.....दारावरची बेल वाजली...." अहो दरवाजा उघडून बघा आले वाटतं...." माधवी किचनमधूनच म्हणाली विजयराव दरवाजा उघडतात ....दारावर शरदराव कुसुम आणि आदिती उभे असतात...." या या शरदराव..... दोघेही एकमेकांना मिठी मारतात लहानपणाचे मित्र आता एकमेकांचे व्याही झालेले असतात म्हणून दोघेही मित्र खुश असतात....(दोघेही आता एकमेकांना आम्ही तुम्ही करुन बोलतात..)"या बसा ...माधवी पाणी घेऊन ये गं ....." विजय राव