स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 18

  • 4.6k
  • 1
  • 2.9k

सकाळी नेहमी प्रमाणे विराज त्याच्या वेळेत उठला.. डोळे उघडले तर अगदी त्याच्या चेहऱ्या जवळच तिचा चेहरा होता....तो जरा मागे झाला लगेच , तिच्या चेहऱ्याकडे तो खूप वेळ पाहत होता....रात्री दोन टोकांना झोपलेले दोघेही सकाळी एकमेकांच्या कुशीत होते!!हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असेल हे इमॅजिन करूनच त्याला हसू येत होत.दिसायला तशी ती होतीच सुंदर.....आता त्याला सुद्धा सवय झालेली झोपेतून उठल्यावर तिचा चेहरा पाहायची...!! आपण फक्त मीरा साठी हिच्याशी लग्न केल आहे..?? मी तिच्या सोबत चुकीचं तर वागत नाही ना..??हे प्रश्न त्याला सारखाच पडत होता...मी फक्त तिच्याशीच का लग्न केल? हा प्रश्न तिला कधी पडला नाही का....लग्ना नंतर तिची