स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 17

  • 3.8k
  • 1
  • 2.4k

ऑफिस जवळ आल्यावर थोड्या अंतरावर मिष्टिने गाडी थांबवायला सांगितली." मी इथेच उतरते....उगीच कोणाला संशय नको." ती एवढं बोलून निघूनही गेली.तो बोलणार पण ती थांबलीच कुठे त्याच ऐकायला!!नाही म्हणलं तरी लग्न झालं असूनही लपवण त्यात मंगळसूत्र पण नाही घालायचं म्हणजे तिला नको वाटतं होत.....उगाच गिल्टी वाटत होत.....मन नाही म्हणत असतानाही करावं लागत होत.त्यात सकाळपासून जाणवत असलेली अनामिक हुरहुर!!तिने छातीवर हात ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेत ती ऑफिसमध्ये गेली.ती तिच्या केबिन मध्ये शिरताच तिने तिची काम हाता वेगळी करायला घेतली...... विराजच आजच वेगळं वागणं ना जाणे पण तिच्या मनाला सुखावून गेले होत." मिष्टी...." अविनाश आत येत म्हणाला.तरीही ती तिच्याच तंद्रीत होती."